प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक आरोग्य सप्ताहाची उत्साहात सुरुवात

ठाणे : प्रादेशिक मनोरुग्णालय येथे आज मानसिक आरोग्य सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. कैलास पवार व dr अर्चना पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास डॉ. नेताजी मुळे, डॉ. प्राची चिवटे, डॉ. अर्चना गडकरी, डॉ. कुसुमा, डॉ. अमोल भुसारे, तसेच DPN कॉलेजच्या प्राचार्या लीना टोणगावकर यांच्यासह यशोदा बेंजेकर, शारन्या भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयातील सर्व मनोरुग्ण तज्ज्ञ, परिचारिका, सिस्टर इन्चार्ज, समाज अधीक्षक, कक्षसेवक, सफाई कामगार तसेच DPN कॉलेजचे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मानसिक आजारातून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी यावेळी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. त्यांच्या अभिप्रायातून नियमित उपचार, औषधोपचार, कुटुंबीयांचे सहकार्य आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित झाले.

कार्यक्रमात विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या तसेच उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे, मानसिक आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करणे आणि रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या सप्ताहामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सर्व अधिकारी, डॉक्टर, मनोरुग्ण तज्ञ परिसेविका सिस्टर इन्चार्ज परिचारिका, कर्मचारी, विद्यार्थी आणि रुग्णांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Shahar Varta News
Shahar Varta News