वर्तकनगरात श्लोका सुपरस्पेशालिटी रूग्णालय सुरू
ठाणे: ठाणे शहरातील वर्तकनगर येथे श्लोका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे शहरातील अद्यावत असे हे रूग्णालय असून वर्तकनगर पंचक्रोशीतील नागरिकांना हे रूग्णालय देवदूत ठरणार आहे.
या परिसरातील हे पहिलेच सुपर स्पेशालिटी रूग्णालय आहे. सुमारे 100 खाटांचे हे रूग्णालय असून सिटी स्कॅन आणि कॅथलॅब असलेले परिसरातील हे एकमेव रूग्णालय आहे. या लॅबमुळे हृदय रूग्णांना तत्काळ सुविधा उपलब्ध होणार आहेत. तीनही पद्धतीचे शास्त्रक्रियागृह या ठिकाणी असून ट्राॅमा केअर सेंटरनेही हे रूग्णालय सुसज्ज आहे. या रूग्णालयात चोवीस तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. रूग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी तैनात असणार असून उपचार दरामध्येही इतर रूग्णालयांपेक्षा दर कमी असणार आहेत.
या रुग्णालयाचा कारभार संचालक नागेश मोर्या, राजेश सिंग, वैद्यकीय विभागाचे डाॅ.राहुल जयकर यांच्या अधिपत्याखाली चालविण्यात येणार आहे.
