ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास त्याचं सोने करुन दाखवीन असा आत्मविश्वास भाजपच्या ठाणे शहरातील कोपरी विभागाच्या पदाधिकारी सुचित्रा भोईर यांनी व्यक्त केला.
प्रभाग आरक्षणाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या निवडणुकीत कोपरी प्रभागातून निवडणूक लढवण्याचा मानस भाजपच्या ठाणे शहर उपाध्यक्षा सुचित्रा भोईर यांनी व्यक्त केला. सुचित्रा भोईर म्हणाल्या राजकारणात आल्यापासून कोपरी गावाच्या विकासाची कास धरली आहे. अजूनही गावपण असणाऱ्या कोपरीत अनेक समस्या आहेत. स्मार्ट ठाण्याबद्दल बोलत असताना आमचं कोपरी गाव मात्र स्मार्ट झालेलं नाही. या गावात स्वतःच्या पैशातून रेशनिंग मिळण्याची सोय केली. गावातील रस्ते अरुंद असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी गावात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी येऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढायचा आहे. कोपरी गावात प्रवेश करण्यासाठी तीन मार्ग आहेत. पण दुदैवाने या तिन्हीही मार्गांच्या सुरुवातील कचराकुंड्या आहेत. त्या हटवून इतरत्र ठिकाणी ठेवण्यात येतील. कोपरी गावाची सून आणि जवळपास पंचवीस वर्षं या प्रभागात वास्तव्यास आहे. त्यामुले इथल्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे पक्ष मला संधी देईल असे मी ठामपणे सांगू शकते.