डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी अभिवादन
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे, कार्यालयीन अधीक्षक दत्ता गोंधळे, कार्यालयीन उपअधीक्षक जयानंद नायकोडी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रविंद्र मांजरेकर, प्रभारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
