विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव निमित्त शाळेत केले स्वागत


दि. १५ जून २०२४जिल्हा परिषद ठाणे *मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सोनाळे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव निमित्त शाळेत केले स्वागत*जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी भिवंडी येथील प्राथमिक शाळा सोनाळे येथे भेट दिली. मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. एकूण ३२ नव प्रवेश विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, गोड जेवण, गणवेश, पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ९३९ विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार ९५४ मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. नवीन जग बघण्यासाठी मुलांनी आज शाळेत प्रवेश घेतला आहे आणि शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी सज्ज रहावे. शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांनी देखील योग्य हातभार लावावा. ग्रामस्थांनी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहे. ठाणे जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत नावीन्यपूर्ण योजना स्मार्ट शाळा राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधा सोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद कायम प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी जंक फूड खाऊ नका, मोबाईलचा वापर करू नका असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी यावेळी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता विकसीत करण्यासाठी सोनाळे शाळा नेहमी पुढाकार घेताना दिसतेच. यावर्षी शाळेची पटसंख्या २१३ असून पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्याध्यापिका पुष्पा भोईर यांनी योग्य नियोजन करावे. सोनाळे येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य वाढविण्यासाठी स्मार्ट टिव्ही भेट शाळेला देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करित आहेत ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले. शाळेतील प्रवेशोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज सोनाळे शाळेत उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने विजय जाधव यांनी आभार व्यक्त केले.  यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, गटशिक्षणाधिकारी संजय असवले, सरपंच माया तरे, उपसरपंच अक्षय पाटील, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुऱ्हाडे, शाळेतील मुख्याध्यापक पुष्पा भोईर, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विषयतज्ञ निलम पिसाळ, शिक्षक विजय जाधव यांनी सुत्र संचालन करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली. 000श्रीम. रेश्मा सावित्री गंगाराम आरोटेजनसंपर्क अधिकारी जिल्हा परिषद ठाणे
Shahar Varta News
Shahar Varta News