आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे 1000 हजार विद्यार्थ्यांना वह्यांची भेट


**जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम**10 वी व 12 वी मध्ये विशेष प्राविण्यने उत्तीर्ण होणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सत्कार करण्यात आला*ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : आई-बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट मिळाली आहे. ज्युनियर केजी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या अगोदर वह्या मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला.संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांच्याकडून १८ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्र मंडळाच्या सभागृहात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते वह्या वाटप तसेच 10 वी व 12 वी मध्ये विशेष प्राविण्यने उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, आई बाबा सामजिक संस्थेचे अध्यक्ष,भाजपाचे चिटणीस जयेंद्र कोळी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, माजी नगरसेवक सुनील हांडोरे,ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे,भाजपा महिला मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्षा सौ. वृषाली वाघुले-भोसले, महिला मोर्चा सरचिटणीस रितू सेखोन,नौपाडा मंडळ सरचिटणीस रक्षा यादव , भाजपा ठाणे शहर जिल्हा सदस्या मीनाक्षी मिस्त्री,भाजपा गुजराती सेल सचिव दिलीप शाह,पंढरीनाथ पवार,ओबीसी उपाध्यक्ष नरेश ठाकूर, अन्वेष जयगडकर, भाजपा शक्तिकेंद प्रमुख नितेश तेली, प्रभाग अध्यक्ष प्रतीक सोलंकी, शुभम गुप्ता, ठणेशहर जिल्हा कमिटी सदस्य रश्मी मोरे, अल्पसंख्याक महिला मोर्चा अध्यक्ष नीखत सारंग, मंडळ चिटणीस अंजली भालेराव, विजेंद्र चटोले, मंडळ उपाध्यक्ष सुनीता भोईर, शीला कोळी, अनुसूचित जाती महिला उपाध्यक्षा अरुणा कांबळे, कविता जाधव, सुनंदा भोईर, दिनेश कोळी, मयूर भालेराव, पंकज जैन, गोकुळ कुंड, कृष्णा देवळेकर, एकवीरा मंडळाचे पदाधिकारी सुरेंद्र भोई, हेमंत भोईर, संघर्ष महिला बचत गट, रमाई महिला मंडळ, रमाबाई महिला मंडळ आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
Shahar Varta News
Shahar Varta News