ठाण्यातील Supermax कामगारांसाठी मुख्यामंत्रीच मैदानात


*ठाण्यातील Supermax कामगारांसाठी मुख्यामंत्रीच मैदानात !

* Supermax कंपनीचा ठाणे येथील प्रकल्प कंपनीने दिवाळखोरी घोषित करून बंद केल्याने सुमारे 1500 कामगार बेकार झाले.कंपनी ने कायद्यानुसार कामगारांना देणी देणे आवश्यक होते,परंतु कंपनीने कायदेशीर पळवाटांचा फायदा घेऊन सदर प्रकरण कंपनी न्यायाधिकरणात नेले.सुपरमॅक्स कंपनी ही आता बंद होऊन निलावात निघालेली आहे कंपनीचे कामगार हे आता देशोधडीला लागलेले आहेत यामध्ये सुमारे 1500 कामगार बेकार झाले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ करून ठेवल्याने सुमारे एक वर्षापासून कामगारांना कोणताही मार्ग दिसत नव्हता सरते शेवटी कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत विनंती केली मुख्यमंत्र्यांनी यातील बाबी समजून घेऊन योग्य ते आदेश प्रशासनाला दिले. कामगारांच्या बाजूने शासन यंत्रणा कामाला लागली आणि तात्काळ राज्य शासनाच्या कामगार विभागाने संबंधित मालमत्ता ताब्यात घेऊन सील करून टाकल्या.सदर आदेशानुसार आता या मालमत्तेवर कोणाला पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे सदर मालमत्तेचा गहाण,तारण विक्रीचा प्रयत्न केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा तो आदेश आहे. यामुळे कामगार वर्गात नवीन आशेचा किरण निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्टाईलने या कामगारांना न्याय मिळवून देतील अशी आशा आहे
Shahar Varta News
Shahar Varta News