ठाणे नगरीत प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने बौद्ध धम्म वर्षावसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथावरील चर्चासत्राचे असा नाविन्यपूर्ण व समाज प्रबोदनात्मक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित चर्चासत्रा महासंचालक श्री. सुनीलजी वारे यांच्या मार्गदर्शना खाली झाले. डॉ. राहुल बोधी महाथेरो, पूज्य भदंत मैत्रेयदोष आयुपाल महाथेरो, प्रा. आनंद देवडेकर यांनी आपले अमूल्य विचार मांडले . या कार्यक्रमाला आ. संजय जी केळकर( आमदार, ठाणे शहर)मा. आ निरंजन जी डावखरे ( आमदार,कोकण पदवीधर मतदारसंघ) माझी आ. भाई ( विजय) गिरकर व दैनिक सम्राट चे कुणाल कांबळे या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री.कृपाल कांबळे, श्री.अभिजीत गायकवाड,श्री. विशाल वाघ,दिनेश मेहरोल, राहुल कुंड, तेजस चंद्रमोरे आदींनी केले होते. कार्यक्रमात अत्यंत दिमागदार व शिस्तबद्ध पार पडला.