कल्याण ग्रामीण मतदारसंघातून ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे निवडणूक लढवण्यास इच्छुक..
दिवा : विधनासभेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षातून इच्छुक उमेदवाराची संख्या वाढत चालली आहे.कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील असून त्यांनाच पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.तसेच त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि तशी तयारी देखील सुभाष भोईर यांच्याकडून सुरूकरण्यात आली आहे. यातचं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे हे देखिल कल्याण ग्रामीण मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मी ही दावेदार आहे, असे मुंडे यांनी सांगितले आणि असून त्यांनी देखील निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी आता दावेदार वाढू लागले आहेत