महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी यांची नियुक्ती


महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .          

   तेलगू साहित्यात विशेष योगदान असलेले श्रीनिवास गुंडारी हे महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघठनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत . महाराष्ट्र राज्य तेलगू साहित्य अकादमी सदश्यांची नियुक्ती नुकतीच महाराष्ट्र् शासनाने केली असून यावर संचालक सचिन निंबाळकर यांच्यासह कार्याध्यक्ष डॉ पी व्ही रामण्णा , सदस्यपदी श्रीनिवास गुंडारी रवीन्द्र संगेवेणी , अशोक कंटे , हरेश कैची , श्रीमती रेणुका बुधाराम , गजानन बेंजकीवार ,सतीश खाणकाम आणि श्रीनिवास कंदकुरी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .  

 श्रीनिवास गुंडारी यांची या महत्वाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आल्याने महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले .

Shahar Varta News
Shahar Varta News