ठाणे :
भारतीय अर्थव्यवस्था असो,पत्रकारिता असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात महत्वाचे योगदान होते असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे प्रागतिक पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे जागतिक स्तरावरचे आहे. त्यांचे काम हे विशिष्ट समाजापुरते नसून त्यांनी सर्वच स्तरातील नागरिकांसाठी काम केले आहे.पत्रकारिता, अर्थव्यवस्था,कायदेमंडळ अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांचे विचार हे सर्वच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार विनोद राय,प्रवीण सोनावणे,यतीन पवार,दीपक कुरकुंडे,गणेश कुरकुंडे,अमर राजभर,गणेश जाधव,उमेश वांद्रे,राजा शेटकर,संदीप खर्डीकर,नितीन दूधसागर,प्रफुल गांगुर्डे,प्रवीण कामत उपस्थित होते.