ठाणे : स्थानिक नगरसेविका आणि शिवसेनेच्या ( शिंदे गट) कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राच्या संघटिका मालती रमाकांत पाटील आणि विधानसभा संघटक रमाकांत (दादा) पाटील यांच्या प्रयत्नाने लकी व्यायामशाळेचे सदस्य आणि नागरिकांवर चुकीच्या पद्धतीने केलेल्या लकी व्यायामशाळा या नावाने लावण्यात आलेल्या नियमबाह्य करप्रणालीची योग्य पद्धतीने कर आकारणी करत त्याठिकाणी सगळ्यांना दिलासा दिला आहे.
लकी व्यायामशाळेच्या नावाने प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने व्यायामशाळेचे सदस्य आणि नागरिकांकडून कर घेतला जात होता. यासंदर्भात मालती आणि रमाकांत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. पण निवडणूक आचार संहितेमुळे हा प्रश्न लांबणीवर पडला. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर आपण हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू असा शब्द मालती आणि रमाकांत पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता मालती आणि रमाकांत पाटलांनी जातीने या प्रश्नात लक्ष घालून प्रशासनाशी चर्चा करून सदर कर प्रणालीत सुधारणा करवून आणली. नवीन कर आकारणीचा फायदा लकी व्यायामशाळेचे सदस्य आणि नागरिकांना होणार असल्याने मालती आणि रमाकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.