सुशांत, पनवची अर्धशतकी खेळी


ठाणे : सुशांत कदम आणि पनव  टेकचंदानीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बेनेट कम्युनिकेशन संघाने युनायटेड पेंट इंडस्ट्रीज संघावर सात धावांनी विजय मिळवत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील आगेकूच केली. सुशांत आणि पनवच्या फलंदाजीमुळे बेनेट कम्युनिकेशन संघाने उभारलेल्या २५० धावांचा पाठलाग करताना युनायटेड पटणी संघाला २४४ धावापर्यंत मजल मारता आली. 
प्रथम फलंदाजी करताना सुशांतने ६८ आणि पनवने ५१ धावा बनवून संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. अद्वय सिधयेने २३ आणि सागर मुळयेने २२ धावांचे योगदान दिले. या डावात पार्थ दर्जिने चार, अखिलेश यादवने दोन बळी मिळवले 
या धावसंख्येचा पाठलाग करताना यश रामचंदानी आणि आर्य गंद्री यांनी अर्ध शतकी खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली पण इतर फलंदाज ढेपाळल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. यश आणि आर्यने प्रत्येकी ८० धावांची खेळी केली. या डावात सागर मुळये आणि वैभव गोसावीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : बेनेट कम्युनिकेशन : ३१ षटकात ९ बाद २५० ( सुशांत कदम ६८, पनव टेकचंदानी ५१, अद्वय सिधये २३, सागर मुळये २२, पार्थ दर्जी ५-३८-४, अखिलेश यादव ४-४०-२) विजयी विरुद्ध युनायटेड पेंट इंडस्ट्रीज: ३५ षटकात : ७ बाद २४४ ( यश रामचंदानी ८०, आर्य गंद्री ८०, विघ्नेश खारगे २२,सागर मुळये ७-३९-२, वैभव गोसावी ७-४५-२).
Shahar Varta News
Shahar Varta News