*महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा ठाण्यात जोरदार आंदोलन**महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रांतध्यक्ष तथा आमदार ज. मो अभ्यंकर साहेब यांच्या आदेशाने* *शिक्षक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले*

    
 
                                    


*प्रशासनाच्या 'असंवेदनशील' कारभाराचा निषेध; रखडलेले वेतन, आणि थकित देयकांवरून शिक्षक आक्रमक*

*प्रशासनाच्या 'अक्षम्य' विलंबाने शिक्षक संकटात*
शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून, वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आणि मागण्या*
*अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन:* 
तर्कहीन निकषांमुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
. **शिक्षक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान गावडे बोलले की*
B.L.O.शिक्षका च्या कामातून मुक्त करा
 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून शिक्षकांना सक्तीने निवडणुकीच्या कामात (BLO) जुंपले जात आहे. हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवण्याची मागणी पत्रात केली आहे.
*मार्च महिन्याचे वेतन अद्याप रखडलेले:*
 एप्रिल महिना अर्धा संपला तरी मार्चचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकले असून त्यांना नाहक दंड सोसावा लागत आहे. '१ तारखेला पगार' ही परंपरा कायम राखण्याची आठवण नसंघटनेने करून दिली आहे.
*परीक्षा काळात पटपडताळणी नको:* 
१० वी, ११ वी आणि १२ वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत 'पटपडताळणी'चा घाट घातला जात आहे, जो शिक्षकांना नाहक त्रास देणारा आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी केली यावे *असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे बोलले*

*प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत, तर १६ एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोंत् असे शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान गावडे बोलले*.

यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते
१) शहाजी खुस्पे नगरसेवक ठाणे महानगरपालिका.
२) श्री मारुती पडळकर सहसचिव महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना 
३)श्री जगदीश भगत कोकण विभाग अध्यक्ष ४)श्री नरेंद्र शिंदे संपर्कप्रमुख शिक्षक सेना ठाणे जिल्हा 

५)कुलदीप पाटील अध्यक्ष शिक्षक सेना आणि जिल्हा ग्रामीण 
 ६)संतोष गायकवाड अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्हा 
७) प्रमोद पाटोळे प्राथमिक अध्यक्ष 
८/) उदय कदम सरचिटणीस ठाणे जिल्हा 
९) दिलीप चौधरी सचिव 
१०) प्रशांत सातपुते विभागप्रमुख
११) स्मिता पाटील सचिव महीला आघाडी 
१२) भा्ंगरे सर प्रसिद्धी प्रमुख ठाणे जिल्हा 
१४) महेश दहिभाते अध्यक्ष कोपरी पाच पाखाडी
१४) विजय भांगरे समन्वय ठाणे जिल्हा 
आणि इतर शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Shahar Varta News
Shahar Varta News