खासदार, आमदार आणि नगरसेवकांची उपस्थिती --------------------------------------------------------कोपरी आनंद नगर बुद्धविहाराच्या नूतनीकरण शुभारंभ उत्साहात संपन्न


ठाणे : वार्ताहर 

अनेक वर्षापासून दुरावस्थेत असलेल्या कोपरी आनंद नगर परिसरातील बुद्धविहाराच्या नूतनीकरणाचा शुभारंभ हा रविवारी १९ एप्रिल रोजी सकाळी स्थानिक नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. या प्रसंगी खा. म्हस्के, आ.निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे आणि बुद्धविहार कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थित नूतनीकरण शुभारंभ पार पडला. 

        बुद्धविहार नूतनीकरण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव आणि स्थानिक रहिवाशी उपस्थितीत होते. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच भीम अनुयायांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या भावना, अपेक्षा आणि विचार जाणून घेतले. बुद्धविहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक एकात्मता, समता, विचारप्रबोधन आणि संस्कारांचे केंद्र असल्याचे मत उपस्थितीतांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. या कार्यक्रमाला संसदरत्न खासदार श्री.नरेश म्हस्के साहेब, आमदार श्री.निरंजन डावखरे साहेब, महापौर शर्मिला पिंपोळलकर उपमहापौर श्री.कृष्णा पाटील, नगरसेवक श्री.विकास रेपाळे, नगरसेविका सौ.नम्रता भोसले-जाधव,  प्रवक्ते श्री.राहुल लोंढे, ज्येष्ठ पत्रकार श्री.आनंद कांबळे अध्यक्ष,श्री.मिलिंद भाऊ बनकर तसेच मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते.
Shahar Varta News
Shahar Varta News