रघुनाथ नगर येथे अंतिम भुखंड क्रमांक १४२पैकी पोट हिस्सा १४२ ब या खाजगी मालकी हक्काच्या भूखंडावर अर्जुनापार्क गृहनिर्माण संकुल उभारण्यात आले आहे. मूळ ७०३९ स्केवर मीटर भूखंडापैकी ३३४४ स्केवर मीटर भूखंडावर अर्जुनापार्क गृहनिर्माण संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. ही जागा जमिनीचे मूळ मालक जिलानी यांचेकडून कमल बेदी यांनी तत्कालीन बाजारभावाने विकत घेतली. त्यानंतर बेदी यांनी १९८९ साली शासकीय नियमानुसार विकासप्रस्ताव क्रमांक ८८००४ , तळ अधिक सात मजल्यांचे अर्जुनापार्क गृहनिर्माण संकुल उभारले. या जमिनीतील तिसरा हिस्सा मुळ मालकाने आपल्याकडेच ठेवला होता आणि उर्वरित दोन हिस्से विकले होते. अर्जुनापार्क गृहनिर्माण संकुल जुने झाल्याने त्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय संकुलाच्या ५४ सभासदांनी घेतला. त्यात अडथळा येऊ नये म्हणून या संकुलाचे गृहित अभी हस्तांतरण (डिम कॅन्वेनियन्स ) करून घेतले होते. पुनर्विकासासाठी जागेची मोजणी करण्यासाठी या संकुलातर्फे जागेची मोजणी करण्यासाठी रितसर अर्ज करून शासकीय कर्मचाऱ्यांना त्याकरता बोलवण्यात आले. पण ४ ऑक्टोबर २०२३ रोजी जागा मोजणी करताना त्यावेळी सुमारे ३० वर्षांनी मूळ मालकाच्या नातेवाईकांनी जागेचा पूर्ण मोबदला मिळाला नसल्याचे सांगत मूळ मालकाच्या नातेवाईकांनी त्याला आक्षेप घेतला. असा प्रकार दोन वेळा घडल्याने अर्जुनापार्क संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जागामोजणी करण्यास मान्यता मिळवली. अर्जुनापार्क गृहनिर्माण संकुलाची उभारणी करण्याच्यावेळीसच मालकाला योग्य तो मोबदला दिला असून, उलट त्यानेच संकुलाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचा आरोप केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज जागेची मोजणी करण्यात आली असल्याची माहिती अर्जुनापार्क गृहनिर्माण संकुलाचे अध्यक्ष रवी हिवराळे यांनी दिली. यावेळी संस्थेच्या सचिव कल्पना बाबर, खजिनदार सचिन जावळे, यांच्या समवेत लता चव्हाण,मिलिंद पंडित, अनुसया मोरे, पंढरीनाथ , दिपक पंडित, डॉ सुषमा सोनवणे, वनीता नायर, पेशकर वरुण, सुरेश यादव, राजेश वाही, मिहिर वाही, रक्षित वाही, प्रशांत दाभाडे, अभय समर्थ आणि मकसूद चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.