धनकवडीस्थित सदगुरू शंकर महाराज यांचा अत्यंत देखणा आणि अध्यात्मिक अनुभूती देणारा मठ दत्तवाडी कळवा येथे उभारण्यात आला आहे. या मठामध्येच सारेगामा फेम तथा बंटी बबली सिनेमात पार्श्वगायन केलेल्या गायिका निहिरा जोशी यांनी ही आरती चित्रीत केली आहे. शंकर महाराजांचे निस्सीम भक्त मनोज प्रधान यांनी त्यासाठी गायिका जोशी यांना साह्य केले आहे. आज सायंकाळी ही आरती पत्रकार परिषदेत प्रदर्शित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी, आईच्या सांगण्यावरून मी शंकर महाराजांचे आध्याय वाचू लागलो. त्यानंतर मला मठातून आसन मिळाले. अन् मी अडचणीत असताना शंकर महाराजांनीच वाचविले आहे. पुण्यात जाणे शक्य नसल्याने, मठ ठाण्यात उभारावा अशी इच्छा शंकर महाराजांकडे व्यक्त केली अन् त्यांच्याच इच्छेने हा मठ उभा राहिला, असे सांगितले.. तर निहिरा जोशी म्हणाल्या की, शंकर महाराज यांच्या पोथीतील आरती गाण्याचा प्रयत्न केला. तुषार देओल यांनी संगीत संयोजन केलेल्या या आरतीचे चित्रीकरण कुठे करावी , ही अडचण होती. मात्र, शंकर महाराजांच्या भक्तीतूनच मला हा मठ गवसला आणि मी इथे आले. मनोज प्रधान यांच्या सहकार्यातून ही आरती चित्रीत झाली. उद्या (दि. 11) ही आरती युट्यूब सह सर्व माध्यमांवर प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे सांगितले