राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) चे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस मा. श्री. नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदी श्री. कौस्तुभ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीप्रसंगी ठाणे शहर प्रभारी तथा नगरसेवक मा. श्री. सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री. मोहसीन शेख, युवक प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. आदित्य धुमाळ यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. कौस्तुभ गायकवाड यांचे अभिनंदन करून आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.