राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १४८ ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲड. झिया सय्यद यांची नियुक्ती


ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभाशीर्वादाने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार मा. श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. नजीब मुल्ला यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १४८ ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲड. झिया सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीप्रसंगी ठाणे शहर जिल्हा प्रभारी श्री. सुहास देसाई, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक व ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत, श्री. रविंद्र पालव, राष्ट्रीय युवा काँग्रेस सरचिटणीस श्री. मोहसीन शेख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. रमेश इंदिसे,  ठाणे शहर असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष श्री. तौफिक शेख तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲड. झिया सय्यद यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य, प्रभावी जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

यापुढे १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक सक्षमपणे कार्य करेल, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करेल आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ॲड. झिया सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

याचवेळी ॲड. झिया सय्यद यांच्या माध्यमातून ओवळा–माजिवाडा ब्लॉक (प्रभाग क्र. ३ व ८), उथळसर ब्लॉक (प्रभाग क्र. १०, ११ व १२) तसेच नौपाडा ब्लॉक (प्रभाग क्र. २१ व २२) येथील ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना पुढील आठ दिवसांच्या आत आपल्या प्रभाग अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नव्या जबाबदारीबद्दल ॲड. झिया सय्यद यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
Shahar Varta News
Shahar Varta News