गांधी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन विभागाकडून धाडसत्र सुरू सी-विभागाकडून 200लिटर गावठी दारू जप्त


ठाणे शहर, ता. 1(बातमीदार) ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने 200 लिटर गावठी दारू आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. अंजूर येथे तयार करण्यात आलेली ही दारू भाईंदर परिसरात विक्रीसाठी आली होती. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शनानुसार गांधी जयंती निमित्ताने ठीक ठिकाणी विभागाकडून गस्त घालण्याचे काम सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क सी-विभागाला गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक आर. बी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाईंदर परिसरात गस्त घातली जात होती. भाईंदर परिसरात गावठी दारूची वाहतूक होऊन ती परिसरात विक्रीसाठी वितरित केली जाणार आहे अशी गुप्त माहिती शिंदे यांना मिळाली होती.  बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून सी विभाग कार्यक्षेत्रात गस्त सुरू असताना (ता.1) संशयास्पद चारचाकी वाहन आढळून आले. अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता 200 लिटर गावठी दारू आढळून आली. लागलीच उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारुसह वाहन आणि इतर 5,70,040 रुपयांचा ऐवज जप्त केला. कार चालक हेमंत किसन पाटील,  अलिमघर पो. अंजुर ता. भिवंडी याला ताब्यात घेतले. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सी विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. बी. शिंदे करीत आहेत.
Shahar Varta News
Shahar Varta News