गडकरी रंगायतनमध्ये 9 ऑक्टोबरला `जल्लोष नारीशक्तीचा

'  

ठाणे : स्त्रीच्या जीवनप्रवासातील संघर्ष, भावना, नाती, स्वप्ने आणि सामर्थ्याचा वेध घेणारा `जल्लोष नारीशक्तीचा' हा विशेष कार्यक्रम जल्लोष संस्थेतर्फे शुक्रवारी, 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, प्रवेश विनामूल्य आहे.  
ख्यातनाम नृत्यप्रशिक्षक पंकज पाडाळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱया या कार्यक्रमात नृत्य, संगीत, अभिनय आणि निवेदनाच्या माध्यमातून स्त्राrच्या विविध रूपांचा आणि तिच्या जीवनप्रवासातील संघर्षांचा अनोखा आविष्कार सादर केला जाणार आहे. स्त्राrच्या आयुष्यातील भावनिक चढ-उतार, तिची स्वप्ने, नात्यांची गुंतागुंत, आव्हानांना सामोरे जाण्याची तिची जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडले जाणार आहे.  
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लावणी नर्तक निखिल मुंबईकर यांच्यासह स्नेहा रवांदे, रागिनी साने, अंजली निकम आणि अमिता शेलार हे कलाकार सहभागी होणार आहेत. नृत्य, संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातून स्त्राrशक्तीचा जागर घडविणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.  
`मैत्रीण गट ठाणे' यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले असून डॉ. प्रतीक्षा बोर्डे सूच्रसंचालन करणार आहेत. स्त्राrच्या कर्तृत्वाला, तिच्या संघर्षाला आणि सामर्थ्याला सलाम करणाऱया या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक पंकज पाडाळे यांनी केले आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News