महापुरुषांच्या पुतळ्यांनावर्धापनदिनानिमित्त वंदननौपाडा प्रभाग समितीतर्फे कार्यक्रम



ठाणे : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्ताने नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतर्फे महापुरुष व प्रेरणादायक व्यक्तींच्या नौपाड्यातील पुतळ्यांना वंदन करण्यात आले. प्रभाग समितीच्या अध्यक्षा मीनल संखे, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या वतीने पुष्पहार घालून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अहिल्यादेवी होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साधू वासवानी, जनरल अरुणकुमार वैद्य, नारायणराव कोळी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी अध्यक्षा मीनल संखे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्याबरोबरच सहायक आयुक्त महेश जामनेर, परिवहन समितीचे माजी अध्यक्ष विलास जोशी, सदस्य नितीन पाटील, कोळी समाजाचे अध्यक्ष केदार लखेपुरिया, भाजपचे कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, शिवसेना कोपरी विभागप्रमुख संतोष बोडके, उपविभागप्रमुख राजू महाकाळ, संतोष सातकर, गणेश मुकादम आदी उपस्थित होते.
Shahar Varta News
Shahar Varta News