शिवाई नगर–वसंत विहार परिसरातभाजपची संघटनात्मक ताकद वाढविणारपक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत निर्धार
ठाणे, दि. ५ (प्रतिनिधी) : शिवाई नगर-वसंत विहार परिसरात भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक ताकद वाढविण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचविण्याचा निर्धार मंडल कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. मंडल अध्यक्ष राकेश मालोजी चौगुले यांनी पक्षवाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता समर्पित भावनेने कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेविका आशादेवी सिंह, माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, रमेश आंब्रे, आदिवासी मोर्चाच्या प्रदेश सचिव नताशा सोनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच संघटनात्मक पाया मजबूत करण्याचा निश्चय करण्यात आला. त्याचबरोबर बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेशी जोडणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना देण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करावे. तसेच आगामी काळातील राजकीय व संघटनात्मक आव्हानांचा सामोरे जाण्यासाठी बूथ, शक्तिकेंद्र आणि मंडल स्तरावरील संघटन सक्षम करावे, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले.
मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांनी मंडलाचे संघटनात्मक कामकाज व आगामी कार्यक्रमांबाबत आढावा घेतला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथस्तरापासून प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करावे, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन राकेश चौगुले यांनी केले.
नताशा सोनकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मंडल उपाध्यक्ष संजय मोरे यांनी अनुमोदन दिले. तसेच मंडल युवा मोर्चा अध्यक्ष रोहित देसाई यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आदित्य सिंह व दिवाकर सिंह यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीला महिला मोर्चा मंडल अध्यक्षा विद्या ताजणे, मंडल सरचिटणीस समाधान साळवी, कोषाध्यक्ष भगवान आडे, उपाध्यक्ष दिनेश सिंह, सुबोध दास, रतनसी गामी, सचिव मृणाल वर्देवार, महिला मोर्चा पदाधिकारी रंजना हजारे, अनुसूचित जाती जिल्हा सचिव सुरेंद्र शर्मा, उत्तर भारतीय मोर्चा मंडल अध्यक्ष दिवाकर सिंह यांच्यासह पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते.