भाजप नेते ठाणे शहर आमदार श्री. संजय केळकर साहेब ह्यांचा ठाणे जिल्हा ग्रामीण दौरा असताना आमदार केळकर साहेब यांनी ज्येष्ठ पत्रकार अमोल कदम यांच्या विनंतीला मान देऊन भिवंडी ग्रामीण परिसरातील सुपेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य श्री अशोक राऊत यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी भाजप आमदार श्री. संजय केळकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच यावेळी ठाणे महानगरपालिका नगरसेवक श्री. विकास पाटील साहेब देखील उपस्थित होते यांचा सन्मान समाजसेवक श्री. राजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अमोल कदम, श्री. प्रकाश कदम ,श्री. नरेश पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार केळकर साहेब यांच्याशी भिवंडी ग्रामीण परिसरातील समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या समस्या सोडवणे हाच माझा प्रमुख उद्देश असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.