तक्रारीकडे दुर्लक्ष; उपायुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली! आता थेट केबिनबाहेर आंदोलन!

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त वैभव आवारे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्याप तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उपायुक्तांच्या आदेशानंतरही सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्याकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय?

या निषेधार्थ अशोक सोनावले यांनी उपायुक्त वैभव आवारे यांच्या केबिनबाहेर आंदोलन सुरू केले असून, मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन ठोस कारवाई करणार की पुन्हा तक्रारीला केराची टोपली दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News