ठाणे : कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णांना अनेकदा वेगवेगळ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. अशा वेळी उपचारांमध्ये समन्वय असणे आणि सर्व तज्ज्ञ एकाच ठिकाणी उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. ही गरज लक्षात घेऊन एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सने ठाण्यात नव्या केंद्राची सुरुवात केली आहे. यासाठी शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञांसह ३० हून अधिक अनुभवी डॉक्टरांची टीम कार्यरत असणार आहे. रुग्णाची प्रकृती, आजाराचा प्रकार आणि वैयक्तिक गरज लक्षात घेऊन त्यानुसार उपचार योजना आखणे, विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या एकत्रित सल्ल्याने उपचार करणे आणि संपूर्ण उपचार प्रक्रियेत रुग्णाला योग्य मार्गदर्शन देणे यावर या केंद्राचा भर असणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन डॉ. चैत्रा शेट्टी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन, डॉ. निलेश चोरडिया, जीआय आणि स्त्रीरोग कर्करोग शल्यविशारद, तसेच जॉन्टी रोड्स, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सचे ब्रँड अॅम्बेसेडर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र अच्युत बडवे यांचीही उपस्थिती लाभली. ते प्रसिद्ध कर्करोग शल्यविशारद आणि संशोधक असून, नोव्हेंबर २०२३ मध्ये निवृत्त होईपर्यंत सुमारे १५ वर्षे मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात संस्थेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला.
या कार्यक्रमात कर्करोगावरील विशेष उपचार सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्याचे महत्त्व, कर्करोग उपचारांमधील नवनवीन बदल आणि रुग्णांना उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मदत मिळण्याची गरज यावर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रासह देशभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, या केंद्रामध्ये विविध उपचार आणि तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, कर्करोगाच्या विशेष शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन उपचारांसाठी मार्गदर्शन, विविध तज्ज्ञांच्या मदतीने उपचार, निदान व विशेष तपासण्या तसेच आनुवंशिक कर्करोगाच्या जोखमीची तपासणी यांचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णाच्या आजारानुसार आणि तपासणीच्या निष्कर्षांनुसार उपचार ठरवले जातील. उपचारांबरोबरच, एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्स रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारानंतरही मदत करणार आहे. यामध्ये पुनर्वसन, फिजिओथेरपी, शस्त्रक्रियेनंतर नियमित तपासणी, घरच्या उपचारांसाठी मदत, रुग्ण सहाय्य, विमा आणि आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय रुग्ण सेवा, २४ तास फार्मसी, वैद्यकीय मदत आणि देशभरात रुग्णवाहिका सेवा यांचा समावेश आहे.
*यावेळी एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि स्त्रीरोग कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. निलेश चोरडिया म्हणाले,* प्रत्येक रुग्णासाठी कर्करोगाचे उपचार सारखे नसतात. कर्करोगाचा प्रकार, त्याची अवस्था, रुग्णाची एकूण प्रकृती आणि वैयक्तिक गरजा यांचे सखोल मूल्यमापन केल्यानंतरच योग्य उपचारपद्धती निश्चित करणे आवश्यक असते. प्रत्येक रुग्णाच्या आजारानुसार त्याच्यासाठी योग्य उपचार योजना तयार करण्यावर आमचा भर असेल. तसेच उपचारांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना रुग्णाला योग्य मार्गदर्शन आणि आधार देण्याची जबाबदारीही आम्ही पार पाडू.
*ठाण्यातील एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलचे हेड अण्ड नेक कॅन्सर सर्जन डॉ. चैत्रा शेट्टी म्हणाल्या की,* “डोक्याच्या आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. तोंडातील जखम बरी न होणे, गिळताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, मानेवर गाठ येणे किंवा सतत घसा दुखणे यांसारख्या लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात. अशी लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होण्यास मदत होते. तसेच बोलणे, गिळणे आणि श्वास घेणे यांसारखी महत्त्वाची कार्ये टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. तंबाखूचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान हे कर्करोगाचे महत्त्वाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे या सवयी टाळणे आणि लक्षणे दिसल्यास वेळेवर डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास रुग्णाच्या बरे होण्यास आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते.”
*माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सचे ब्रँड अॅम्बेसेडर जाँटी ऱ्होड्स म्हणाले,* कर्करोगाचा परिणाम हा केवळ त्या रुग्णावरच होत नाही, तर त्याच्या कुटुंबीयांवर आणि या संपूर्ण प्रवासात त्याला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरही होतो. या उपक्रमामुळे अधिकाधिक लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल, अशी आशा आहे. शरीरात काही असामान्य बदल जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आणि आरोग्याच्या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव लोकांना होणे गरजेचे आहे.