ठाणे शहर दैनिक पत्रकार कक्षेत संविधान गौरव दिन साजरा

ठाणे : ठाणे शहर दैनिक पत्रकार कक्षेत संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित पत्रकारांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक व जाहीर वाचन केले.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क आणि अधिकार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकारांवर असल्याचे सांगितले. ठाण्यातील पत्रकार ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचेही नमूद करण्यात आले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला असलेले स्थान हा पत्रकारांसाठी गौरवाचा विषय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या रूपाने दिलेली देणगी अमूल्य असून, संविधानातील मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा वकील आनंद कांबळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव राजीव डाके, खजिनदार राजा शेटकर, सदस्य प्रफुल्ल गांगुर्डे, सदस्य नितीन दूधसागर, सदस्या सारिका साळुंखे, किशोर जाधव, सुरेश साळवे आदी पत्रकार उपस्थित होते.
Shahar Varta News
Shahar Varta News