ठाणे : ठाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत
नेते सचिनभाऊ शिंदे स्मृती वाचनालयाचे नुकतेच आमदार संजय केळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.सचिनभाऊ शिंदे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून या वाचनालयाचे काम करण्यात आले. हे वाचनालय तयार व्हावे या करता स्थानिक नगरसेविका उषा विशाल वाघ आणि भाजपा नौपाडा मंडळ उपाध्यक्ष विशाल दिलीप वाघ यांनी पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा केला होता. या लोकार्पण समारंभासाठी जेष्ठ नगरसेवक पवन कदम, नगरसेवक सिताराम राणे,नगरसेवक सुहास देसाई, प्राजक्ता सचिन शिंदे, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष जयेंद्र कोळी, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष राहुल पिंगळे, राजेश जाधव, उबाटा उपशहर प्रमुख सचिन चव्हाण,निलेश कोळी,दिलीप शहा, परेश कांबळे, विजय पवार, स्वप्निल तांबे, साहिल सूर्यवंशी, अमर लोखंडे, सुरेंद्र भोईर, सुशांत फाटक, गजानन प्रधान, एकविरा मित्र मंडळाचे पदाधिकारी,नव विशाल बौद्ध मंडळाचे पधादिकारी जय मल्हार मित्र मंडळाचे पधादिकारी आणि नितीन ढमाले,शिरीष घरत, दिनेश मेहरोल,प्रविण खैरालिया, अंकुश चिंडालीयय,राखी खैरालिया, अजय राठोड, गिरीश मेहरोल,सुजित भाल आदी मान्यवर उपस्थित होते.